छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कल्पना इतक्या व्यापक आणि दूरगामी होत्या की त्यामध्ये कोणताही फेरफार न करता आपण आजच्या परिस्थितीतही त्यांचे अनुकरण करू शकतो.
प्रजेला शांतता, सहिष्णुता, सर्वांना समान संधी, कार्यक्षम आणि शुद्ध राज्यकारभार पद्धती, व्यापार वृद्धीसाठी आरमार, तसेच मायदेशाच्या रक्षणासाठी लढाऊ लष्कर — ही महाराजांच्या राजकारणातील मूलभूत ध्येये होती.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या प्रतिभावंतांनाही, गुणवत्ता असेल तर, शिवाजी महाराजांकडे काम करण्याची संधी प्राप्त होई. त्यांच्या कार्यपद्धतीने राज्यकारभार सर्व क्षेत्रांना स्पर्श करून प्रजेची सर्वांगीण उन्नती साधली. आधुनिक राज्याने अनुसरण्यास योग्य अशी शासन-व्यवस्था महाराजांनी प्रत्यक्ष अंमलात आणली.
या व्याख्यानमालेमध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा, निर्णय-प्रक्रियेचा, नेतृत्वशैलीचा, आणि आधुनिक प्रशासनाशी त्यांचा संबंध यांचा सखोल ऊहापोह केलेला आहे.
व्याख्याते
डॉ. केदार महादेवराव फाळके